kelwe beach

नागरिकांची पावले एक दिवसीय व दोन दिवसीय सहली आणि पर्यटनासाठी पुन्हा एकदा बाहेर पडू लागली आहेत. केळवे या रम्य समुद्रकिनारी मुंबई-नाशिक गुजरात इथल्या पर्यटकांचा ओढा असून मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्यामुळे इतके दिवस थंड पडलेल्या हॉटेल व्यवसायालाही पुन्हा सुगीची चाहूल लागली आहे.

पालघर : अनलॉक सुरू झाल्यापासून केळवे समुद्रकिनारा गेले सात महिने ओस पडले होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर किनारे पुन्हा पर्यटकांनी फुलू लागले आहेत.

नागरिकांची पावले एक दिवसीय व दोन दिवसीय सहली आणि पर्यटनासाठी पुन्हा एकदा बाहेर पडू लागली आहेत. केळवे या रम्य समुद्रकिनारी मुंबई-नाशिक गुजरात इथल्या पर्यटकांचा ओढा असून मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्यामुळे इतके दिवस थंड पडलेल्या हॉटेल व्यवसायालाही पुन्हा सुगीची चाहूल लागली आहे.

पर्यटन प्रेमींच्या मनात अद्याप कोरोनाची भीती असल्याने पर्यटक जवळचे पर्यटन क्षेत्र म्हणून केळवा बीचला पसंती देत आहेत. पुन्हा पर्यटक केळव्याकडे वळू लागल्याने पर्यटन व्यवसायासाठी निगडीत व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रिक मोटार रायडिंग घोडा गाडी,खाद्यपदार्थ विक्री या व्यवसायांमध्ये असलेल्या छोट्या व्यवसाय त्यांच्या चेहऱ्यावरही या गर्दीमुळे आनंद दिसत आहे.

१५ मार्चपासून बंद असलेला हा व्यवसाय आता सुरू झाल्यामुळे याच्या अगोदर पूर्वी मोठ्या फॅमिली दिवाळीच्या सिझनला यायच्या आता छोट्या फॅमिली यायला लागले आहेत. आत्ता हळूहळू हा व्यवसाय वेग पकडेल .- चेतन सावे, हॉटेल व्यावसायीक

गेल्या सात महिन्यांपासून पर्यटन बंद होते. पर्यटन हंगाम हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच असतो. आता कंटाळलेले लोक मोठ्या प्रमाणात बाहेर निघून पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

- आशिष पाटील, अध्यक्ष- केळवे बीच पर्यटन उद्योग विकास मंच