Two Mumbaikars drown in Virar lake
या तलावात दोन तरुण बुडाले.

  • फोटो काढताना घडली घटना

वसई (Vasai).  सहलीसाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा विरारच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. असे बोलले जाते कि फोटो काढताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी येथे राहणारे १० मित्र विरार येथील शिरगाव कुंभारपाडा धरणाजवळ रविवारी सहलीसाठी आले होते. दुपारी खानपान झाल्यानंतर विश्रांती घेत असताना अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सर्व मित्र तलाव परिसरात गेले. त्यातील दोघांनी तलावात उतरून आपल्या मोबाईल मध्ये फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघे तलावात बुडाले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर तलावात शोध घेतला असता मंगेश राणे आणि सूर्यकांत सुवर्णा या दोघांचे मृतदेह सायंकाळी उशिरा हाती लागले. 

मुंबईतील दहा जणांचा ग्रुप साठी या परिसरात आला होता त्यातील दोन जण फोटो काढण्यासाठी तलावात उतरले आणि त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला - सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक