rajesh ganatra

दोन्ही फुफ्फुसे ५० टक्के निकामी असतानाही वसईतील एका रुग्णाला सरकारच्या ढकलगाड्यामुळे चक्क सुमारे ८ ते ९ तास वसई-मुंबई-वसई असा प्रवास एसटीने करावा(patient traveling vasai to mumbai) लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

विशाल राजेमहाडिक, वसई: दोन्ही फुफ्फुसे ५० टक्के निकामी असतानाही वसईतील एका रुग्णाला सरकारच्या ढकलगाड्यामुळे चक्क सुमारे ८ ते ९ तास वसई-मुंबई-वसई असा प्रवास एसटीने करावा(patient traveling vasai to mumbai) लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी यंत्रणेने जर माणुसकी दाखविली तर या रुग्णाला रेल्वे प्रवास करण्याची परवानगी(no permission to travel from train) सुद्धा मिळू शकते आणि त्याच्या सारख्या असंख्य अश्या लोकांचा सुद्धा फायदा होऊ शकतो. खरे तर अश्या काही रुग्णांसाठी राज्य सरकारने ‘एक खिडकी’ उपाययोजना सुरु करून त्यांना तात्काळ सेवा सुविधा दिली पाहिजे.

दोन्ही फुफ्फुसे ५० टक्के निकामी झाल्यामुळे वसईच्या वसंत नगरीत राहणारे राजेश गणात्रा पुढील उपचारासाठी परदेशात जाणार होते. मात्र,कोरोना संकटातील लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयावर अवलंबून रहावे लागले.महाराष्ट्र शासनाने कोवीडच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोवीड टास्क फोर्सची स्थापना केली.या फोर्समधील नामांकीत डॉ.झरीर उदवाडीया यांचा समावेश आहे. योगायोग म्हणजे गणात्रा यांच्यावर उपचार हे खुद्द डॉ.झरीर उदवाडीया अगोदर पासूनच सुरु आहेत.मात्र, लॉकडाऊनमुळे पुढील उपचारासाठी ते परदेशात जाऊ नाही शकले आणि सध्या इथेच उपचार घेत आहेत.

गणात्रा यांना आठवड्यातून तीन दिवस मुंबईला (नरिमन पॉईंट ) कामासाठी एसटीने जावे लागते. सकाळी साडेपाचला घर सोडल्यानंतर रात्री साडेदहालाच त्यांना घर दिसते. या सोळा सतरा तासातीत ८ ते ९ तास प्रवासात खर्च होतात.त्यामुळे वेळ,श्रम आणि पैशाचाही चुराडा होतो. गणात्रा यांच्या प्रकृतीवर एसटीच्या अश्या प्रवासामुळे विपरीत परिणाम होत असल्यामुळे ते काळजीत असतात.त्यामुळे गणात्रा यांना रेल्वेतून प्रवास करणे अत्यावश्यक असल्याचे पत्र डॉ.उदवाडीयांनी दिले. हे पत्र गणात्रा यांनी मुख्यमंत्र्यांपासून,गृहमंत्रालयापर्यंत सर्व खात्यांना देवून रेल्वे प्रवासाच मुभा मागितली.त्यावर गृह विभागाचे विशेष सचीव,सहसचीव आणि खुद्द मुख्यमंत्र्यांच्या दालनातून “तुमचे पत्र पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्याचे” गणात्रांना सांगण्यात आले. त्यांचे हे मागणी पत्र गेल्या १० -१२ दिवस फक्त ह्या टेबलावरून त्या टेबलावर घिरट्या घालत आहे.

कोवीड च्या टास्क फोर्समधील डॉक्टरांनी शिफारस केल्यानंतरही मला रेल्वे प्रवासाची मुभा अद्याप मिळाली नाही. इतरांची काय अवस्था असेल याची कल्पनाही सहन होत नाही.५० टक्के निकामी फुफ्फुसे घेवून मी एसटीने ८ ते ९ तास प्रवास करतो. जरी सर्व अधिकारी निर्णय लवकर घेत आहेत, तरी शेवटचा आदेश येइसतोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असे दिसत आहे. पण मला विश्वास आहे की मला आणि माझ्यासारख्या असंख्या रुग्णांना लवकरच रेल्वेने प्रवास करता येईल. – राजेश गणात्रा