वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय, १८ मार्चपासून वसई – विरार पालिका हद्दीमधील शाळा, महाविद्यालये बंद

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आठवडा बाजार,जत्रा,लग्नकार्य,खरेदीसाठी झुंबड उडत असल्यामुळे सोशल डिस्टन्स पायदळी तुडवली गेली.त्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली . त्यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी अखेर वसई विरार पालिकेने (vasai virar corporation)शाळा बंद(school and colleges closed in vasai virar) करण्याचा निर्णय घेतला आहे.

    वसई: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वसई-विरार पालिका हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये १८ मार्चपासून बंद करण्याचे आदेश वसई विरार पालिकेचे आयुक्त गंगाधरण डी यांनी दिले आहेत.

    कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी महापालिकेने दिली होती. त्यानुसार आठवी ते बारावी, पाचवी ते सातवीचे वर्ग भरवण्यास शाळांनी सुरुवातही केली होती. सॅनिटायजर, सोशल डिस्टन्स,मास्क अशा त्रिसुत्रीचा वापर करून काही दिवस शाळा सुरु झाल्या.सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली नाही. त्यानंतर वसई-विरारमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

    काही दिवसांपुर्वी रुग्णसंख्या कमी आणि बरे होवून घरी परतणार्‍यांची संख्या वाढती होती.आता हे चक्र उलट झाले असून,बरे होवून घरी परतणार्‍यांची संख्या घटत चालली आहे. दररोजची कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.गेल्या दहा दिवसांत चारशेहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली.त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या ३१ हजारावर पोहोचली आहे. त्यापैकी ९०० जण दगावलेही आहेत.

    लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आठवडा बाजार,जत्रा,लग्नकार्य,खरेदीसाठी झुंबड उडत असल्यामुळे सोशल डिस्टन्स पायदळी तुडवली गेली.त्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली . त्यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी अखेर पालिकेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १८ मार्चपासून पालिका हद्दीतील सर्व शाळा,महाविद्यालये बंद करण्याचे आदेश आयुक्त गंगाधरण डी यांनी दिले आहेत.