VASAI VIRAR MUNICIPAL CORPORATION

कोव्हीड १९ विषाणूच्या संसर्गामुळे(Corona Spread) आई किंवा वडीलांचे अथवा दोन्ही पालकांचे निधन झाल्यामुळे अनेक बालके अनाथ(Orphan Children) झाली आहेत. बाधित व्यक्तींचे वाढलेले मृत्यूचे प्रमाण विचारात घेता त्यांच्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे.

    वसई: कोरोनामुळे(Corona) निधन झालेल्या व्यक्तीच्या १८ वर्षाखालील मुलांचे संगोपन करण्याचे वसई विरार महापालिकेकडून(Vasai Virar Corporation) प्रस्तावित करण्यात आले असून तशी माहिती विविध स्तरावरून मागवण्यात येत आहे.

    कोव्हीड १९ विषाणूच्या संसर्गामुळे आई किंवा वडीलांचे अथवा दोन्ही पालकांचे निधन झाल्यामुळे अनेक बालके अनाथ झाली आहेत.बाधित व्यक्तींचे वाढलेले मृत्यूचे प्रमाण विचारात घेता त्यांच्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे.

    कोव्हीड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे दोन्ही पालकांचे (आई-वडील) निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या अथवा आई किंवा वडिलांचे निधन झालेल्या बालकांची (१८ वर्षाखालील) गंभीर समस्या निर्माण झाली आहे.अशा बालकांचे यथायोग्य संगोपन होणे आवश्यक असल्यामुळे वसई विरार महापालिकेकडून शहराच्या हद्दीतील अशा अनाथ मुलांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.

    नागरिकांनाही कोव्हीड-१९ च्या संसर्गामुळे दोन्ही पालकांचे (आई-वडील) निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या अथवा आई किंवा वडिलांचे निधन झालेल्या बालकांची माहिती महिला व बालकल्याण विभागाला द्यावी. किंवा mbk.vvmc@gov.in या ई मेल वर माहिती द्यावी असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.