Vidyarthi Bharati Virar Vibhag unique Kandeel in diwali 2020
विद्यार्थी भारतीच्या विरार विभागाचे या दिवाळीत एक अनोखे कंदील...

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विध्यार्थी भारती संघटना विरार विभागाने दिवाळीच्या निमित्ताने कंदील बनवला आहे. कल्पना राकेश सुतार यांची असून मदतीला सचिन सुतार, मनोज तेंडुलकर, सुनीता सुतार, ऐश्वर्या तोडकरी व सोबत विरार टीम मदतीला होते.

पालघर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विध्यार्थी भारती संघटना विरार विभागाने दिवाळीच्या निमित्ताने कंदील बनवला आहे. कल्पना राकेश सुतार यांची असून मदतीला सचिन सुतार, मनोज तेंडुलकर, सुनीता सुतार, ऐश्वर्या तोडकरी व सोबत विरार टीम मदतीला होते.

समाजात जनजागृती करेल व लोकांना एक महत्वपूर्ण संदेश देईल असं कंदील दरवर्षी बनवला जातो, तर यावर्षी जगावर आलेलं संकट म्हणजे कोरोना ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसापासून ते गोरगरीब जनतेवर बिकट परिस्थिती आली. तरीही या एवढ्या मोठ्या संकटांना सामोरे जाणारे व त्याच्यापासून आपले रक्षण करणारे आपले सुपर हिरो डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, मीडिया या सर्वांमुळे आपण सुरक्षित आहोत असे राकेश सुतार यांनी सांगितले.

हे एका झाडाच्या मजबूत खोडासारखे रस्त्यावर उतरून ठाम उभे आहेत आणि आपलं रक्षण करत आहेत या सर्व सुपर हिरोना लाख लाख सलाम व सध्या ठाकरे सरकार ही कोरोनाच्या काळात ज्या पध्द्तीने लोकांना सांभाळतआहे त्यांची चांगली व्यवस्था केली आहे आणि मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी तर सामान्य माणसाला घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत असं बोलून चांगला धीर दिला आहे व त्यांनी म्हटलं की माझं कुटुंब ही माझी जवाबदारी आहे हाच संदेश लोकांन पर्यंत पोचावा म्हणून ह्या कंदील च्या मार्फत संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न विद्यार्थी भारती संघटना विरार विभाग करत आहे असे सचिन सुतार यांनी सांगितले.