flower farming

फुल शेतीचा(flower farming) तालुका म्हणून सर्वत्र विक्रमगड(vikramgad) तालुक्याची ओळख होऊ लागली आहे.शेतकऱ्यांच्या जिद्द आणि चिकाटीला शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची जोड मिळाली आहे.यासाठी शासकीय योजनाचे योगदानही मोठे आहे.

  अमोल सांबरे, विक्रमगड : विक्रमगड(vikramgad) तालुका म्हटल की कुपोषण, दारिद्र्य, रोजगारासाठी स्थलांतर करणारे मजूर, पारंपारीक भात शेती, नागलीचे पीक काढणारा तालुका म्हणुन सर्वत्र परिचित आहे. पारंपारिक शेतीतून शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वाटचाल करत आहेत. पाच-सहा वर्षांपासुन तालुक्याचे चित्रच पूर्ण बदलुन गेले आहे. फुल शेतीचा तालुका म्हणुन सर्वत्र तालुक्याची ओळख होऊ लागली आहे.शेतकऱ्यांच्या जिद्द आणि चिकाटीला शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांची जोड मिळाली आहे.यासाठी शासकीय योजनाचे योगदानही मोठे आहे.

  पारंपारिक शेतीला बगल देत विक्रमगड तालुक्यातील शेतकरी फुलशेतीकडे जाऊ लागला आहे. आज विक्रमगड तालुक्यांची ओळख फूल उत्पादक तालुका म्हणून पाहावयास मिळत आहे.

  खांड, उघानी,कुंर्झे, साखरा, वाकी, पोचाडा, माण भागात मोठ्या प्रमाणात मोगरा लागवड केली आहे. वसुरी, हातणे, वाकडूपाडा भागात काही शेतकऱ्यांनी गुलाब लागवड केली आहे. ओंदे,देहर्जा भागात सोनचाफा लागवड पहावयास मिळत आहे. विक्रमगड मधील मोगरा, सोनचाफा, गुलाब,झेंडू नाशिक, दादर मार्केटला जात आहे. दादर किवा नाशिकचा फुल बाजारात विक्रमगडचा मोगरा, सोनचाफा अशी ओळख सद्या फुल व्यापारी ग्राहकांना करुन देत आहेत. त्यामुळेच की काय तालुक्यात शेतीला विशेष महत्व येऊ लागल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना फुल शेतीतुन चांगला पैसा मिळत आहे. या फुलशेतीतुन तालुक्यातील अनेक शेतकरी लखपती झाले आहेत.

  तत्कालीन ठाण्याचे जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्या संकल्पनेतुन आदिवसी भाग असलेल्या जव्हार व विक्रमगड तालुक्यात मोगऱ्याचा प्रकल्प राबविण्यात आला.त्यास शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. मोगरा मुंबईच्या बाजारपेठेत ही फुले घेऊन जाण्यासाठी तक्तलिंन जिल्हा अधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी वाहने उपलब्ध करुण दिली होती. वाहने नसल्याने वेगळा पर्याय शोधावा लागत होता.वाहतुक यंत्रणा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचे श्रम व पैसाही वाचला ग्रामीण भागातील मोगरा उत्पादकांना आपली हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली त्यामुळे आदिवासी शेेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सध्या सुमारे तालुक्यात ३०० ते ३५० शेतकरी मोगऱ्यांची लागवड व उत्पादन करीत आहेत.

  २०१६-१७ मधील तालुक्यातील फुल शेती लागवड: झेंडू- ३.००हेक्टर, सोंनचाफा २.५०, हेक्टर,मोगरा- १८०.८ हेक्टर लागवड करण्यात आली आहे.

  फुल शेतीने रोजगारासाठीचे होणारे स्थलांतर कमी
  तालुक्यात पारंपारिक पद्धतीने शेती हाच व्यावसाय केला जात होता. शेतीची कामे ही फक्त जुन ते नोव्हेंबर या सहा महिनेच असल्याने उर्वरित ६ महिन्यांसाठी येथील आदिवासी मजुराना रोजगारासाठी मुंबई,ठाणे, भिवंडी, मीरा भायंदर, वसई, येथे विट भट्टी, रेती व्यावसाय, बोटी, इमारतीचे बांधकाम या कामावर स्थलांतर करावे लागत होते.

  पंचायत समितीचा रोजगार हमीच्या नोंदणीनुसार ६७ हजारांपेक्षा अधिक मजुर कुटुंबाची नोंदणी करण्यांत आली आहे.तर त्यांना शंभर टक्के जॉबकार्डचे देण्यांत आले आहेत त्या प्रमाणे लाभार्थ्यांची खातीही खोलन्यात आली आहेत. यापैकी अनेक मजूर हे अल्प भुधारक असताना ही रोजगारासाठी अन्यत्र स्थलांतर करत असत परंतु तालुका कृषी विभाग, पंचायत समिती कडून अनेक महत्वाकाशी फुल शेती लागवाडी संधरभात जनजागृती, मेळावे, योजना राबवल्याने अनेक अल्प भुधारक शेतमजुरानी मोगरा फुलशेती लागवड केली आहे.

  एकरी ४-५ किलो मोगरा उत्पादन प्रमाणे किलोला २५० प्रमाणे १०००-१२०० रूपये दिवसाला मिळू लागल्याले आहे. मोगराचा कळ्या खुडण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागत आहेत. मोगरा खुड़नारा मजूरासाठी किलोमागे ४० रूपये मिळत असल्याने मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच रोजगारासाठी होणारे स्थलांतर चार-पाच वर्षात कमी झाले आहे.

  महागाई खूप वाढली आहे. शेतीपूरक अवजारांचे भाव दाम दुप्पट झाले आहेत. खते, औषधे, बियाणे,रोपे याचे भाव मजूरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महागाईचा फटका फूल शेती उत्पादकानांसुद्धा बसला आहे. फुल शेतीचे अनुदान वाढवुन हेक्टरी ८० हजार करावे. त्याचप्रमाणे फुल शेतीसाठीसुद्धा ठिबक सिंचन योजना राबवुन फुल शेतीसाठी ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान द्यावे.

  - बबन सांबरे,फुल उत्पादक शेतकरी

  अनुदान वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी
  विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात फुल शेती लागवड केली जाऊ लागली आहे. त्यासाठी या वर्षापासुन तालुका कृषी विभागाकडून मोगरा, सोनचाफा, गुलाब फूल शेतीसाठी अनुदान दिले जात आहे. एक हेक्टरसाठी अधिक अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्या कडून करण्यात आली आहे. या वाढता माहगाईत शेती औजाराचे किंमती ही दाम दुप्पट झाल्याने रोपे, खते, औषधे, फवारणी यंत्रे याचा कीमती दुप्पटिने वाढले असल्याने वाढत्या महागाईत हे अनुदान जास्त देण्याची मागणी शेतकर्यांन कडून हे अनुदान वाढवुन फुल शेती साठी हेक्टरी १ लाख अनुदान देण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.

  फुल शेतीलाही मिळावे ठिबक सिंचन अनुदान
  फुल शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. पाण्याची बचत करण्यासाठी सध्या राज्यातील सर्वच फलबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना फल बागेला ठिबक सिंचन लावण्यासाठी हेक्टरी २३,५०० अनुदान दिले जात आहे. त्याच धर्तीवर फुल लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. फुल शेतीला ही ठिबक सिंचन अनुदान योजना लागु केल्यास नवीन शेतकऱ्यांना फुल शेती लावण्यास उत्तेजन मिळेल त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होईल असे मत शेतकऱ्यांचे आहे.