surya project protest

कवडास येथील सूर्या प्रकल्पात कोसेसरी, भोवाडी, धरमपूर, तलवाडा, या गावांची जमीन पाण्याखाली जाणार आहे.या गावातील लोकांचे विस्थापण करण्यात येणार असून या विकास प्रकल्पाचा स्थानिकांना मात्र काहीच काडीमात्र फायदा होणार नसून त्यांचे नुकसान होणार आहे.

कासा: कवडास येथील सूर्या प्रकल्पात(surya project) कोसेसरी, भोवाडी, धरमपूर, तलवाडा, या गावांची जमीन पाण्याखाली जाणार आहे.या गावातील लोकांचे विस्थापण करण्यात येणार असून या विकास प्रकल्पाचा स्थानिकांना मात्र काहीच काडीमात्र फायदा होणार नसून त्यांचे नुकसान होणार आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवत आज गुरुवारी सूर्यानगर येथे पाटबंधारेच्या कार्यालयात स्थानिक लोकांनी धडक मोर्चा काढला. मनोर येथील पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे पत्र देऊन देखील आज पाटबंधारे विभागाचा एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही.त्यामुळे येथील ग्रामस्थांनी संतापून अनेक घोषणा देत तीव्र निषेध दर्शविला.

कवडास बंधाराचे एमएमआरडीएकडून सध्या उंची वाढविन्याच्या कामाला वेग आला असून आजूबाजूच्या गावातील  गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. कवडास धरणाची तीन मीटर (अंदाजे दहा फूट )एवढी उंची वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे कवडास बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये पावसाळ्यात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच स्थानिक लोकांनी मोर्चा काढून बंधाऱ्याची उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला जाहीर निषेध केला आहे.

यावेळी मनसे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा देऊन आम्ही हा प्रस्तावित प्रकल्प हाणून पाडू तसेच ज्या ज्या वेळी स्थानिक ग्रामस्थांना धरणाबाबत समस्या उद्भवल्या त्यावेळी मनसे संघटना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन मनसे पक्षाचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष जाधव यांनी केले.

बंधाऱ्याचे बांधकाम लवकरच बंद करू. बांधाऱ्याची उंची वाढवण्यापेक्षा त्यातला गाळ काढून त्याची खोली वाढवा, त्यात धरणची खोली वाढेल असे कार्यकर्त्यांनी विभागाला सांगितले. एवढा मोठा खर्च का करताय प्रश्न सरकार समोर उपस्थित करणार आहेत? असे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.

आज पाटबंधारे विभागाला लेखी पत्र देऊन सुद्धा सूर्यानगर येथे एकही अधिकारी उपस्थित झाला नाही. जर हे काम बोलून थांबणार नसेल तर पुन्हा एकत्र येऊन मनोर येथील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.जे स्थानिकांना हवाय तेच आम्ही करू सध्याच्या बंधाऱ्याचे काम चालू असून या बंधारा चे पाणी इथल्या स्थानिक लोकांना मिळत नाही. आजूबाजूच्या खेड्यापाड्यात लोकांना प्यायला पाणी नाही आणि जर धरणाचं पाणी मुंबई ठाणे नवी मुंबई इथे नेणार असाल तर आम्ही या बंधाऱ्याला तीव्र विरोध करू.

एखादा नवीन प्रकल्प येतो त्याचा फायदा हा स्थानिकांना झाला पाहिजे. मात्र त्याचा फायदा स्थानिकांना न होता नुकसान करण्याचे काम सरकार करीत आहे.

विकासकामांना माझा विरोध नाही. मात्र धरणाची उंची वाढवून धरणाच्या आजूबाजूच्या परिसरातील गावे विस्थापित करण्याचा जो प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडू. आज अधिकाऱ्यांना मी भेटून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करु नाही समजले तर पुढच्या वेळेला त्यांच्या तोंडाला काळ बसल्याशिवाय राहणार नाही.

- अविनाश जाधव, ठाणे/पालघर मनसे जिल्हाध्यक्ष

धरणाची उंची वाढविण्याचे काम तात्काळ रद्द करून त्यातील गाळ काढून धरणाची खोली वाढविण्यात यावी.जर असे झाले नाहीतर आमची जमीन पाण्याखाली येणार आहे.त्यामुळे आमचा बंधाऱ्याची उंची वाढविण्याच्या कामाला कायम विरोध राहील.

- कविता धांगडा, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भवाडी