vadhvan jetty

अलिकडेच पालघरच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी वाढवणला पाठिंबा असल्याचे सांगून ६५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे आपल्या भागाचा विकास होणार असेल तर जनतेने याचा सकारात्मकतेने विचार करावा,असे आवाहन केले होते.

पालघर: अलिकडेच पालघरच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी वाढवणला पाठिंबा असल्याचे सांगून ६५ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे आपल्या भागाचा विकास होणार असेल तर जनतेने याचा सकारात्मकतेने विचार करावा,असे आवाहन केले होते. आठवले यांच्या या वक्तव्यावरून वाढवण परिसरातील गावांमध्ये आणि किनारपट्टीवरील गावांमध्ये नाराजी पसरली आहे. या वक्तव्याचा निषेध केला गेला.

वाढवण बंदरा संदर्भात आठवले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समितीमार्फत टिघरे पाडा येथील मुंडेश्वरीमाता मंदिरासमोर नागरिकांनी मोठ्या संख्येने जमून केला. पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या या विनाशकारी बंदरामुळे येथील सधन गावे उध्वस्त होणार असल्याने आठवले यांनी इथे लाखो रोजगार निर्माण होणार असे वक्तव्यसुद्धा केले होते.

कोणत्याही परिस्थितीचा अभ्यास न करता, येथील जनतेच्या भावना लक्षात न घेता असे पाठिंबा असलेले वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे वाढवणवासीयांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात इतर प्रकल्पात जे नागरिक प्रकल्प बाधित आहेत त्यांना सरकारने वर्षोनुवर्षे सोयी सुविधांपासून वंचित ठेवले आहे व वाढवण बंदर उभारून हे सरकार येथील नागरिकांची हीच गत करणार आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. शेवटी आठवले यांचा तीव्र निषेध नोंदवून हे बंदर रद्द करा अशी मागणी केली.