Villages to be excluded from Vasai Virar Municipal Corporation
वसई-विरार महापालिकेतून गावे वगळणार?

मी वसईकर अभियानाचे (mi vasaikar campaign) अध्यक्ष मिलिंद खानोलकर (Milind Khanolkar) यांनी मुख्यमंत्र्यांना सोपा मार्ग सुचल्यामुळे लवकरच महापालिकेतून (mahapalika) ३५ गावे वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • वसईकरांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला सोपा मार्ग

वसई: वसई तालुक्यातील (vasai tehsil) ५३ गावे, वसई नगर परिषद आणि तीन नगरपालिकांसह वसई-विरार महापालिकेची (Vasai Virar Municipal Corporation) स्थापना करण्यात आली होती. वसईकरांच्या इच्छेविरुद्ध शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे गावे वगळण्यासाठी (excluded) विवेक पंडित (Vivek Pandit) यांच्या नेतृत्वाखाली वसईत उत्स्फूर्त आंदोलने झाली. त्यावेळी विरोधी पक्षात असलेले शिवसेना (shivsena) आणि भाजप (bjp) यांनी वसईकरांची बाजू विधिमंडळात उचलून धरली होती. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वसईला येवून या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले होते. परिणामी आघाडी सरकारने २९ गावे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता.

या शासन निर्णयाविरुद्ध तत्कालीन महापौर राजीव पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गावे वगळण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली होती .त्यानंतर गेली नऊ वर्ष या याचिकेवर सुनावणी झाली नाही त्यामुळे गावे वगळण्याच्या निर्णयाची वसईकर अजूनही वाट पाहत आहेत.

शासनाने घेतलेल्या २९ गावे वगळण्याच्या निर्णया पूर्वी कोकण विभागीय आयुक्त संधू यांच्या एक सदस्यीय समितीने ३५गावे वगळण्यात यावीत असा अहवाल राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार शासनाने ५ एप्रिल २०१० ला ३५ गावे महापालिकेतून वगळण्याची प्रारूप अधिसूचना जाहीर केली होती.

मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने जाहीर केलेल्या अधिसूचनेस सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे शासनाने नव्याने अधिसूचना काढून मराठा आरक्षण मराठा समाजात लागू राहील अशी तरतूद केली. त्यानुसार न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या गावांच्या प्रश्नाचा तिडा निकाली काढण्याकरता ३५ गावे महानगरपालिकेतून वगळण्याबाबत नव्याने अधिसूचना काढली तर गावे वगळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल असा उपाय मिलिंद खानोलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सुचवून तसा निर्णय घेण्याची विनंती केली आहे. उद्धव ठाकरे हे पूर्वीपासूनच महापालिकेतून गावे वगळण्याच्या निर्णयाशी सहमत आहेत त्यामुळे त्यांनी नव्याने अधिसूचना काढली तर महापालिकेतून लवकरच २९ गावे वगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसा निर्णय घेतला तसा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ गावे वगळण्याचा निर्णय घेऊन अधिसूचना जाहीर करावी. त्यामुळे वसईकरांना महापालिकेतून मुक्ती मिळेल.

मिलिंद खानोलकर (मी वसईकर)