dahanu human chain

वाढवण बंदर(wadhvan port) हटविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या खडकात जैवविविधतेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांना रोखण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि तिला पाठिंबा दिलेल्या अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाढवण बंदर परिसरातील किनाऱ्याला मानवी साखळी(human chain) करून संरक्षित केले आणि सर्वेक्षणाचे काम रोखण्यास सज्जता दाखवली.

डहाणू : वाढवण बंदर(wadhvan port) हटविण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या खडकात जैवविविधतेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांना रोखण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि तिला पाठिंबा दिलेल्या अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वाढवण बंदर परिसरातील किनाऱ्याला मानवी साखळी(human chain) करून संरक्षित केले आणि सर्वेक्षणाचे काम रोखण्यास सज्जता दाखवली. मात्र या सर्व कामासाठी वैज्ञानिक आले नाहीत.

त्याचवेळी शेकडो महिलांनी समुद्र किनाऱ्यावर बैठक मारून वाढवण बंदर हटाव असे मानवी शिल्प उभारले होते. यावेळी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट च्या सांगण्याने वाढवण किनाऱ्यावरील खडकात असणाऱ्या लाखो में रोज च्या झाडाखाली असणाऱ्या विविध जैवविविधतेचा अल्प सर्व करण्याच्या कामासाठी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक राकेश पी एस यांच्या नेतृत्वाखाली पथक येणार होते मात्र ते आले नाहीत हा सर्वे रोखण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आणि तिला पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती नॅशनल फिश वर्व फॉर्म आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी मच्छीमार संघ ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ आदिवासी एकता परिषद भूमी सेना कष्टकरी संघटना अशा सामील झालेल्या संस्थांचे शेकडो कार्यकर्ते समुद्रकिनाऱ्यावर सामील झाले होते. मात्र समुद्री सर्वेच्या कामासाठी वैज्ञानिक आले नसल्याने शेकडो महिला पुरुषांनी मानवी साखळीने किनारा संरक्षित केला होता. शिवाय महिलांनी किनाऱ्यावर बैठक मारून वाढवण बंदर हटाव असे घोषणा शिल्प बनविले होते.

यावेळी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या सभेत नारायण पाटील,काळूराम धोधडे, ज्योती मेहेर, जयप्रकाश भाय, अशोक अंभीरे, ब्रायन लोबो, असे अनेक कार्यकर्ते सामील होऊन त्यांनी वाढवण बंदरामुळे शेती, बागायती, मच्छीमारी, डायमेकिंग, व्यवसाय नष्ट होणार असून या बंदराला सर्वांनी संघटितपणे विरोध करण्याचा निर्धार त्यांच्या भाषणांतून व्यक्त करण्यात आला.