water

पाणी टंचाईवर (water shortage in vasai virar)मात करण्यासाठी नवीन नळ जोडण्या(new water connection) बंद करण्याचा धाडसी निर्णय वसई विरार(vasai virar) पालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी तालुक्यातील लाखो लोकांना आणखी वर्षभर वाट पहावी लागणार आहे.

    रविंद्र माने, वसई: वसई(vasai)तालुक्याला पाणी पुरवठा(water supply) करणार्‍या धरणातील पाण्याची पातळी (water level is down in vasai virar)खालावल्यामुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन नळ जोडण्या बंद करण्याचा धाडसी निर्णय वसई विरार पालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी तालुक्यातील लाखो लोकांना आणखी वर्षभर वाट पहावी लागणार आहे.

    कोरोनाच्या काळात पालिकेची सर्व कामे ठप्प झाली होती.त्यात नवीन नळ कनेक्शनसाठी केलेल्या अर्जांचाही समावेश होता.लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पालिकेची कामे सुरु झाल्यामुळे जुन्या अर्जांसोबतच नवीन अर्जही पालिकेच्या ९ प्रभागात साचून राहिले होते. हे सर्व अर्ज मुख्यालयात पाठवण्यात आले होते.या अर्जांची संख्या पाहून पालिका आयुक्त चक्रावून गेले.

    वसई विरारसाठी ३३८ ऐवजी फक्त १५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असताना सत्ताधार्‍यांनी मुबलक पाण्याचा केलेला खोटा दावा उघड झाला आहे. मुबलक पाणी असताना २३०० अर्ज प्रतिक्षेत का ठेवण्यात आले याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे.

    - मनोज पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष

    उन्हाळा सुरु झाल्यानंतर धरणातील पाण्याची पातळी कमी होत जाते. पाणी मागणार्‍यांची संख्या वाढत चालल्यामुळे धरणात उरलेल्या पाण्याचे पाऊस पडेपर्यंत कसे नियोजन करायचे या विवंचनेत सापडलेल्या  पालिका आयुक्त गंगाथरण डी यांनी नवीन कनेक्शनला स्थगिती देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.पाणी पुरवठा विभागाने कळवलेल्या अहवालानुसार हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    धरणाची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार नवीन कनेक्शनला स्थगिती देण्यात आली आहे.

    - गंगाथरण डी, पालिका आयुक्त

    त्यांच्या या आदेशाचा मुद्दा धरून भाजपाने सत्ताधारी बहुजन विकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. प्रत्येकवेळी पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूका जिंकणार्‍या सत्ताधार्‍यांनी मुबलक पाणी असल्याचा केलेला दावा खोटा असल्याचे आयुक्तांच्या आदेशावरून सिद्ध होत आहे,असा टोला भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी केला आहे.

    पालिकेतील लोकसंख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. दरडोई १३५ लिटर पाणी पुरवठ्यानुसार या लोकसंख्येला ३३८ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत पालिकेकडे २३० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. त्यातही ३५ टक्के चोरी आणि गळती वजा केल्यास १५० ते १६० लिटर पाणी प्रत्यक्षात उपलब्ध होत आहे.त्यामुळे आवश्यकतेच्या पन्नास टक्केही पाणी नसताना सत्ताधार्‍यांकडून मुबलक पाण्याचा खोटा दावा केला जात आहे.अशी आकडेवारी पाटील यांनी जाहीर करून आघाडीवर टीका केली आहे.

    बहुजन विकास आघाडीतर्फे पाणी पुरवठ्याची जबाबदारी पाहणारे माजी सभापती प्रफुल्ल साने यांची या प्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नतंर फोन करतो असा मेसेज त्यांनी पाठवला.