naygav subway

नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या एकमेव सबवेत पाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहिले आहे. पावसाने विश्रांती घेऊन सहा दिवस उलटले असतानाही या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पादचारी आणि दुचाकी वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

वसई : पावसाने विश्रांती घेऊन सहा दिवस उलटले असले तरी पश्‍चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे सबवेत पाणी(water logging in naygav subway) असल्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या एकमेव सबवेत पाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहिले आहे. पावसाने विश्रांती घेऊन सहा दिवस उलटले असतानाही या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पादचारी आणि दुचाकी वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

नायगाव स्थानक हे पश्‍चिम रेल्वेवरील कमी गर्दीचे स्थानक असले तरी या परिसरातील पूर्व व पश्‍चिम परिसरातील नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून जाऊ नये म्हणून पश्‍चिम रेल्वेने सबवे या स्थानकात बांधला आहे. मात्र हा सबवेचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे थोड्याशा पावसात सभेचे तलावात रुपांतर होते.पंपाच्या साह्याने पाणी उपसून काढावे लागते. मात्र ही बाब वेळखाऊ पणाची असल्याने त्याचा जास्त त्रास प्रवाशांनाच सोसावा लागत आहे .