विरारमधील धक्कादायक घटना, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने पंख्याला लटकून केली आत्महत्या

विरार(Virar) पूर्व येथील मनवेलपाडा भागातील दादूस क्लासिक नावाच्या इमारतीमद्ये नरेंद्रसिंग परमार आपली पत्नी संतोष परमारसह राहात होते. दिड वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. काही दिवसांपुर्वीच संतोषचा भाऊ विरारला राहायला आला होता. बुधवारी सकाळी जेव्हा संतोषचा भाऊ कामावरून घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडल्यावर त्याला बहिण आणि बहिणीच्या नवऱ्याचा मृतदेह दिसून आला. त्याने विरार पोलिसांना(Virar Police) या घटनेची माहिती दिली.

    विरार : विरारमध्ये(Virar) राहणाऱ्या नवविवाहित दाम्पत्यापैकी पतीचा मंगळवारी मृत्यू(Death of Husband) झाला. त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने बुधवारी सकाळी घरात पंख्याला लटकून आत्महत्या(Wife Committed Suicide) केल्याचे समोर आले आहे. विरार पोलिसांनी दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना नवापूर भागात घडली होती. नवापूरमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीने आत्महत्या केली होती. आता विरारमध्ये तशीच घटना घडली आहे.

    सूत्रांच्या मते, मंगळवारी संध्याकाळी नरेंद्रसिंह यांच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ते ११ वाजता परत घरी आल्यावर त्यांच्या पोटामध्ये पुन्हा दुखू लागले. त्यांनी इनो घेतले पण त्याने काही फरक पडला नाही. नरेंद्रसिंग यांचे रात्री निधन झाले. पतीचा मृत्यू झालेला बघून पत्नी खूप घाबरली. तिने घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्व येथील मनवेलपाडा भागातील दादूस क्लासिक नावाच्या इमारतीमद्ये नरेंद्रसिंग परमार आपली पत्नी संतोष परमारसह राहात होते. दिड वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. काही दिवसांपुर्वीच संतोषचा भाऊ विरारला राहायला आला होता. बुधवारी सकाळी जेव्हा संतोषचा भाऊ कामावरून घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा उघडल्यावर त्याला बहिण आणि बहिणीच्या नवऱ्याचा मृतदेह दिसून आला. त्याने विरार पोलिसांना या घटनेची माहिती दिली.