डहाणू नगरपरिषद
डहाणू नगरपरिषद

डहाणू (Dahanu) :  पालघर जिल्ह्यातील डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे व नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्यामध्ये वाद सुरु असतानाच राजपूत यांच्यावर नगरपरिषदेचा गैरकारभार व गैरप्रकार प्रकरणी कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे व नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्यातील  वाद राजपूत यांना भारी पडताना दिसत आहे. मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी नगरविकास मंत्रालयाकडे काही दिवसा पूर्वी लेखी तक्रार केली होती त्या तक्रारीची चौकशी सुरु झाली असून पालघरचे जिल्हाधिकारी यांच्या दालनात 19 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत अतुल पिंपळे व भरत राजपूत यांना आपापली बाजू मांडण्याची संधी जिल्हाधिकारी यांच्या कडून देण्यात येणार आहे.

अतुल पिंपळे यांनी भरत राजपूत यांच्या विरोधात गैरप्रकार व गैरवर्तन केल्या प्रकरणी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाच्या कलम 55 अ व ब नुसार कारवाई करावी असा प्रस्ताव शासनास पाटवला होता. सदर अहवालाची व नगराध्यक्षांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याबाबतची कारवाई करणेबाबत नगरविकास मंत्री यांना अधिकार असून त्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आता 19 ऑक्टोबर रोजी दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून आपला अहवाल सादर करतील. या बाबतच्या नोटीसा मुख्याधिकारी व नगराअध्यक्ष यांना पाटवन्यात आल्या आहेत. वरील विषयाबाबत माहिती घेण्यासाठी नगराध्यक्ष राजपूत यांच्याशी मोबाईल वरुण संपर्क साधला असता त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.