परभणीत कोरोनाचा धुमाकूळ, २४ तासांत ५ जणांचा मृत्यू

  • जिल्हात गेल्या २४ तासांत ५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१८ वर गेली आहे.

परभणी – राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परभणीत कोरोना रुग्णांनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्थानिक प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे.

जिल्हात गेल्या २४ तासांत ५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१८ वर गेली आहे. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ४८ वर गेली आहे. जिल्ह्यात ४११ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. चालु स्थितीत ३५९ रुग्णांवर कोरोनावर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.