लग्नसोहळा आटोपून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाने केला घात, ; भीषण अपघातात एक ठार तर सहा जखमी

सेलू येथून लग्न सोहळा आटोपून पूर्णा तालुक्यातील गौर येथील वऱ्हाड गावाच्या दिशेने परत जात होते. झिरोफाटा-पुर्णा रस्त्यावर एक ट्रॅक्टर आणि ट्रक कातनेश्वरजवळील झिरोफाट्याजवळ जात होती. त्याचवेळी समोरून इनोव्हा कार येत होती. परंतु ट्रॅक्टर चालकाने नियंत्रण गमावले असता त्याने समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला धडक दिली. या भीषण अपघातानांतर ट्रॅक्टर रोडच्या कडेला जाऊन पडले.

    परभणी : लग्नसोहळा आटोपून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाने घात केला आहे. वऱ्हाडाच्या इनोव्हा कारला ट्रॅक्टर आणि ट्रकची भीषण धडक झाली. त्यामुळे या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (सोमवार) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घडली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सेलू येथून लग्न सोहळा आटोपून पूर्णा तालुक्यातील गौर येथील वऱ्हाड गावाच्या दिशेने परत जात होते. झिरोफाटा-पुर्णा रस्त्यावर एक ट्रॅक्टर आणि ट्रक कातनेश्वरजवळील झिरोफाट्याजवळ जात होती. त्याचवेळी समोरून इनोव्हा कार येत होती. परंतु ट्रॅक्टर चालकाने नियंत्रण गमावले असता त्याने समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला धडक दिली. या भीषण अपघातानांतर ट्रॅक्टर रोडच्या कडेला जाऊन पडले.

    दरम्यान, एकापाठोपाठ वाहनांचे जोरदार आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. तोपर्यंत वऱ्हाडातील मागचे वाहने देखील घटनास्थळी पोहोचले. जखमींना तात्काळ वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले. मात्र, इनोव्हामधील एकाचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.