pankaja munde

रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर यांच्यानंतर पंकजा यांनीही सरकार स्थापनेबाबत वक्तव्य केल्याने  भाजप सत्तास्थापनेबाबत आखणी करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

परभणी  :  मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील(Marathwada Graduate Constituency) भाजपसह मित्रपक्षाचा विजय म्हणजे सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरणार असल्याचे  सुचक वक्तव्य  भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांनी केले आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर यांच्यानंतर पंकजा यांनीही सरकार स्थापनेबाबत वक्तव्य केल्याने  भाजप सत्तास्थापनेबाबत आखणी करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

परभणीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंढेच्या नेतृत्वात एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

पदवीधर निवडणुकीत भाजप पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा म्हणजे हा विजय सरकार स्थापनेची मुहूर्तमेढ ठरेल असे सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाची तारीख येते,  तेव्हा तेव्हा यांचा वकील जात नाही.  अर्णब गोस्वामीला आत टाकण्यासाठी जेवढी फौज वापरली जाते,  ती आरक्षणासाठी केली असती तर? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी सत्तासाधाऱ्यांना विचारला आहे.

भाजपचे पदवीधर उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे बैठकीलाही पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पदवीधरांची निवडणूक देखील जातीयवादावर होते आहे. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात कुठला प्रश्न सोडविला? महापोर्टलमध्ये झालेला गोंधळ कधी सुटेल,  एमपीएससीच्या तारखा कधी जाहीर होतील यासाठी कधी विचारले का?  अनेक प्रश्न सोडवले नाहीत.

फडणवीस सरकारने आरक्षण दिले.  मात्र, यांनी त्यावर नेमके  काय केले? मिळालेले अॅडमिशन बंद होत आहेत. तरीपण आपण यांना का निवडून देतो? अशी टिका पंकजा मुंडे यांनी आघाडी सरकारवर केली आहे.