bird flu

महाराष्ट्रावर ‘बर्ड फ्लू’चे सावट पसरले आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात  ८०० कोंबड्यांचा मृत्यू  बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आले असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

परभणी : महाराष्ट्रावर ‘बर्ड फ्लू’चे सावट पसरले आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात  ८०० कोंबड्यांचा मृत्यू  बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिली आहे. परभणी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आले असून मुंरुबा गावातील सर्व कोंबड्या आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील अनेक भांगामध्ये कोंबड्या, कावळे आणि इतर पक्षांचा मृत्यू झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. त्यानंतर आता महाराष्ट्रातही धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नाही. मात्र, परभणी पाठोपाठ लातूर, बीडमध्ये पक्षी-कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यासह ठाण्यातही अनेक पक्षी मृतावस्थेत आढळून आलेत.

दरम्यान, यापूर्वीच राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले होते.