राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण

 परभणी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबाजानी दुर्रानी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बाबाजानी दुर्रानी यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विद्यमान सदस्य बाबाजानी दुर्रानी यांची काल शुक्रवारी अँटिजेन चाचणी घेण्यात आली होती. परंतु या चाचणीचा अहवाल कोरोना प़ॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर बाबाजानी यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून शनिवारी माहिती दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी ताप आणि सर्दी झाली होती. यानंतर कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तेव्हापासूनच आपल्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं बाबाजानी दुर्रानी यांनी म्हटलं आहे.