पाथरी अद्याप विकासनिधीच्या प्रतिक्षेत, एक वर्ष लोटलं, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली?

मागील वर्षात साई जन्मभुमी वरून पाथरी विरुद्ध शिर्डी असा मोठा वाद रंगला होता. तसेच दोन्ही ठिकाणी मोठी आंदोलन झाली. देशभरात हे प्रकरण गाजले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विकास निधी घ्या, विकास करा, वाद नको असं म्हणत वाद तर मिटवला. मात्र निधी काही दिला नाही. निधीची घोषणा होऊन वर्ष लोटले तरी अद्याप एक रुपयाही न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांविरोधात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

नाशिक : साई जन्मभुमी पाथरीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी निधीची घोषणा केली होती. परंतु एक वर्ष लोटलं असून अद्यापही पाथरी विकासनिधीच्या प्रतिक्षेत असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तर खरी, परंतु निधी कधी मिळणार? यावरून प्रश्नावरून पाथरीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.