परभणीत गेल्यात २४ तासात विक्रमी पाऊसाची नोंद ; मुसळधार पावसात २३२ मेंढ्याचा कळप गेला वाहून

येत्या तीन दिवसात आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

    परभणी: राज्यात विविध भागात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला असून , अनेक जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे. परभणी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून जिल्हाभरात गेल्या २४ तासात २३२ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिरसी बुद्रुक या गावातील तब्बल २३२ मेंढ्या असलेला एक कळप वाहून गेल्याची दुर्दैवी घटना यावेळी घडली आहे. या घटनेमुळे मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

    येत्या तीन दिवसात आणखी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात मेंढ्या मरण पावण्याची कदाचित पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे.