परभणीत १२४ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

गेल्या २४ तासांत (Last 24 hours) १२४ जणांचा अहवाल आज शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह ( corona positive) आला आहे. तसेच ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परभणीत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आतापर्यंत सुमारे २ हजार ९८२ च्या वर गेला आहे.

परभणी : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. परभणीत (Parbhani ) गेल्या २४ तासांत सर्वाधिक रूग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २४ तासांत (Last 24 hours) १२४ जणांचा अहवाल आज शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह ( corona positive) आला आहे. तसेच ६ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. परभणीत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आतापर्यंत सुमारे २ हजार ९८२ च्या वर गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या परभणी जिल्ह्यात १ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे १ हजार ६३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिह्यात आतापर्यंत उपचारादरम्यान १३० जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परभणीत कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, परभणीसोबतच राज्यातील काही भागांत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.