धक्कादायक! ‘या’ कारणामुळे युवकाचा केला खून

परभणी – परभणी शहरात पैसे उसने घेऊन परत न दिल्यामुळे एका युवकाला मारहाण करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना ९ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

परंतु या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाने काद्राबाद प्लॉट भागातील काही आरोपींना २० हजार रूपये उसने दिले. ते पैसे परत मागण्यासाठी हा मृत व्यक्ती आरोपींकडे गेला होता. परंतु आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्यामुळे, आरोपींना त्याच्या डोक्यात रॉड मारून त्याचा खूण करून टाकला.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता, पोलिसांना या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. तसेच पुढील चौकशी सुरू आहे.