परभणीत कोंबड्यांचा अचानक मृत्यू, प्रशासनाकडून गावात कोंबड्यांची विक्री बंद

परभणी गावात ९०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु हा मृत्यू कशामुळे झाला ? हे अद्यापही अस्पष्ट आहे. पशुसंवर्धन विभागाने ( Department of Animal Husbandry) गावात भेट दिली असता मृत पक्षांचे नमुने (Samples) पुण्याला पाठवले आहेत.

परभणीच्या (Parbhani ) मुरूंबा गावात अचानकपणे कोंबड्यांचा मृत्यू (Sudden death of hens ) झाल्याची माहिती समोर आली आहे. गावात ९०० पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु हा मृत्यू कशामुळे झाला ? हे अद्यापही अस्पष्ट आहे. पशुसंवर्धन विभागाने ( Department of Animal Husbandry) गावात भेट दिली असता मृत पक्षांचे नमुने (Samples) पुण्याला पाठवले आहेत.

मुरूंबा आणि आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात कुक्कुट विक्रीवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, हा प्रकार बर्ड फ्यूमुळे झाला असावा असी शंका व्यक्त केली जात आहे. तर मृत कोंबड्यांचा अहवाल पुण्याला पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच कोंबडयांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय. हे स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या तरी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.