परभणीत मुलाचे लग्न समारंभ करणं पडलं महागात, दहाजण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या काळात परभणीत गंगाखेड येथील जिनिंग व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ आपल्या जिनींग मध्ये घेतला. त्यामुळे दहाजण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाकडून वारंवार कुठलेही धार्मिक आणि लग्न समारंभ राजकीय सभा घेण्यावर प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. तरीदेखील येथील व्यावसाय़िकाने असे केल्यामुळे दहा रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

 मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने आता या जिनिंग चालकावर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून या रुग्णांत संदर्भात लागलेला सर्व खर्च वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. दरम्यान, रुग्णांच्या तपासण्यासाठी लागलेला खर्चही या व्यावसायिकाकडून प्रशासन वसूल करणार आहे.   

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मंगल कार्यालय बंद असताना लग्न समारोहास परवानगी नसताना अशा प्रकारे स्वागत समारोह घेतल्याने राधेश्याम भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.