पुण्यात मंगळवारी १२०४ नवीन कोरोना बाधित; ११२३ रुग्णांना डिस्चार्ज

शहरात मंगळवारी नवीन १ हजार २०४ कोरोना बाधितांची भर पडली असून बरे झालेल्या १ हजार १२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील १४ रुग्णांसह शहरात आज ५८ रुग्ण उपचारादरम्यान मरण पावले आहेत.

शहरात एका दिवसांत ५८ मृत्यूंची नोंद

पुणे : शहरात मंगळवारी नवीन १ हजार २०४ कोरोना बाधितांची भर पडली असून बरे झालेल्या १ हजार १२३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील १४ रुग्णांसह शहरात आज ५८ रुग्ण उपचारादरम्यान मरण पावले आहेत.

कोरोना बाधितांची शहरातील संख्या ८५ हजार ७०० झाली असून आतापर्यंत ६८ हजार ९०० रुग्ण बरेही झाले आहेत. तर आतापर्यंत २ हजार ७७ जण मरण पावले आहेत.  आजमितीला १४ हजार ७२३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ७९६ रुग्ण गंभीर आहेत. त्यापैकी  ४८३ रुग्णांना आयसीयूमध्ये व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर कोरोनामुळे श्‍वास घेण्यास त्रास होत असलेल्या २ हजार ६४८ रुग्णांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज ६ हजार ३७० संशयितांची स्वाब आणि अँटीजेन कीटद्वारे तपासणी करण्यात आली आहे.
पुणे विभागातील १ लाख ४५हजार ७१९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ लाख ९४८ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ४९ हजार ८४८इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण ५ हजार ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.७५ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ७२.५ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ४७ हजार ३९२ रुग्णांपैकी १ लाख १२ हजार ६४८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३१ हजार २३७ आहे. कोरोनाबाधित एकूण ३ हजार ५०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.३८ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ७६.४३टक्के आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ३ हजार ३९६ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात २ हजार ३५१, सातारा जिल्ह्यात ४४३, सोलापूर जिल्ह्यात २९४, सांगली जिल्ह्यात १७४तर कोल्हापूर जिल्ह्यात १३४ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

नगरसेवकही कोरोनाच्या विळख्यात

महापौर मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, आमदार मुक्ता टिळक, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्यासह डझनभरहून अधिक नगरसेवक कोरोनातून बरे झाले असून कामावर पुर्ववत रूजू झाले आहेत. मात्र, यानंतरही नव्याने काही नगरसेवक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यामध्ये सभागृहनेते धीरज घाटे, नगरसेवक दिपक पोटे, गणेश बिडकर, अजय खेडेकर, आनंद रिठे, भैय्यासाहेब जाधव, बाबूराव चांदेरे यांनाही नुकतेच कोरोनाची लागण झाली असून कुटुंबातील अन्य सदस्यही पॉझीटीव्ह आले आहेत. महापालिका प्रशासनातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अतिरिक्त आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी असे साधारण ४०० कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे.