सातारा :कोयना धरण परिसरात वारंवार भुकंपाचे धक्के जाणवतात.  या  धरण परिसरात  रविवारी मध्यरात्री १.२० ते १.३० च्या सुमारास २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा  भूकंप झाला. याचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. हा भूकंप अतिसौम्य प्रकारातील असल्याने याचे धक्के जाणवले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार , भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चांदोली गावाच्या पश्चिमेला ६ किलोमीटर अंतरावर होता. तर केंद्रबिंदूची खोली ४ किलोमीटर इतकी होती. कोयना धरणापासून या केंद्रबिंदुचे अंतर ११.२ किलोमीटर लांब होते. हा भूकंप सौम्य स्वरूपाचा होता.