चाकणमधील कंपनीतील ७६ जण कोरोनाबाधित

पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसोगणित वाढत चालला आहे. यातच पुणे जिल्ह्यातील चाकण मध्ये एका कंपनीतील ७६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे.

पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसोगणित वाढत चालला आहे. यातच पुणे जिल्ह्यातील चाकण मध्ये एका कंपनीतील ७६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीतील सुमारे ९०० जणांची कोरोना चाचणी केली होती. या स्वॅब टेस्टिंगच्या रिपोर्ट्स मध्ये ७६ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. कंपनीचे नाव सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला असला तरी संबंधित कंपनीतील लोकांना आवश्यक त्या सूचना दिल्या जात आहेत. 

जिल्हा प्रशासनाने सध्या कंटमेंट झोनमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम चा पर्याय वापरण्यास द्यावा अशा सुचना चाकण एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना दिल्या आहेत.तसेच जे कर्मचारी ऑफिस मध्ये येउन काम करतील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा कंपनीची आहे, त्यामुळे कार्यक्षेत्रात सॅनिटायजेशन करण्यापासुन ते कर्मचार्‍यांच्या आरोग्य तपासणी पर्यंत सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनलॉक अंतर्गत आता पुन्हा खाजगी ऑफिस सुरु होत असताना आरोग्याबाबत हलगर्जी केल्यास कोरोना आणखीन बळावु शकतो असा इशारा शासनाने वेळोवेळी दिला आहे.