शिरूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या टाकळी भीमा (ता. शिरूर) या गावचा सरपंच रवींद्र दोरगे व त्याच्या पत्नी आणि वडिलांवर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक( land fraud) करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा (atrocity) दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

सरपंचावर यापूर्वी अनेक गुन्हे, सध्या भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या टाकळी भीमा (ता. शिरूर) या गावचा सरपंच रवींद्र दोरगे व त्याच्या पत्नी आणि वडिलांवर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक (land fraud) करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा (atrocity) दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
टाकळी भीमा (ता. शिरूर) गावचे सरपंच रवींद्र दोरगे यांनी तळेगाव ढमढेरे येथील दीपक आल्हाट यांची तळेगाव ढमढेरे येथील जमीन गट नंबर १३९१ माधीन जमीन जानेवारी २०१९ मध्ये विकत घेतली होती. जमीन खरेदी करताना रवींद्र दोरगे याने आल्हाट यांना जमिनीच्या किमतीच्या रकमेचे चेक दिले होते. आल्हाट यांनी सदर चेक बँकेत भरल्यानंतर चेक रिटन आले यामुळे आल्हाट यांनी वारंवार दोरगे यांच्याशी संपर्क करून पैशाची मागणी केली असता दोरगे वेगवेळ्या तारीख देऊ लागले. त्यांनतर आल्हाट यांची जमीन दोरगे यांनी इतर व्यक्तींना विक्री केल्याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे आल्हाट यांनी सदर जमिनीचे सर्च रिपोर्ट काढून पाहणी केली असता रवींद्र दोरगे याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आल्हाट यांचे पैसे न देता त्या जमिनीची शरद रामदास संकपाळ रा. कळवंतवाडी आंबळे (ता. शिरूर) सविता सुरेश जगताप रा. खराडी पुणे व वीरसेन बाळकृष्ण गायकवाड रा. दत्ता चौक मुंढवा पुणे यांना सदर जमिनीची विक्री केल्याचे समजले. त्यामुळे जमिनीचे मूळ मालक दीपक आल्हाट व त्यांच्या नातेवाइकांनी टाकळी भीमा येथे जाऊन रवींद्र दोरगे याचेकडे पैशाची मागणी केली असता दोरगे याने आल्हाट व त्यांच्या नातेवाइकांना जातीवाचक शिवीगाळ केली.

नातेवाइकांना जातीवाचक शिवीगाळ
यावेळी रवींद्र दोरगे यांचे वाडीला बाळासाहेब दोरगे व पत्नी हे त्याठिकाणी आले आणि त्यांनी देखील सर्वांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली याबाबत दीपक चंद्रमनी आल्हाट रा. तळेगाव ढमढेरे बाजारतळ (ता. शिरूर) सध्या रा. सिद्धार्थ कॉलनी चेंबूर मुंबई यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टाकळी भीमाचे सरपंच तथा भारतीय जनता पार्टी सरपंच आघाडीचे शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब दोरगे, त्याचे वडील बाळासाहेब दोरगे व पत्नी ( नाव माहित नाही ) यांच्या विरुद्ध फसवणूक करत जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले तर मुख्य आरोपी रवींद्र दोरगे हा फरार झाला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दौंड विभागचे अतिरिक्त उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे व पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार हे करत आहे.

शिक्रापूर पोलीस रवींद्र दोरगेला अटक करणार का?
टाकळी भीमा (ता. शिरूर) ग्रामपंचायतचे माजी सरपंच रवींद्र दोरगे यांनी यापूर्वी देखील जमिनीच्या फसवणूक केलेल्या असून त्याबाबत दोरगे यांचेवर फसवणूक तसेच सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. शिक्रापूर पोलिसांना दोरगे यांस अटक करण्यात अपयश आलेले होते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविला होता परंतु आता तरी शिक्रापूर पोलीस घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला अटक करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.