वाईत नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई

वाई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वाई नगरपरिषदेने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारपासून वाई शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेत नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन दिवसांमध्ये दोन लाखांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.

वाईतील ब्राह्मणशाही, सोनगीरवाडी व  धर्मपुरी परिसरात  कोरोना रुग्ण आढळले आहेत.तसेच  मुख्य बाजारपेठेतील दुकानांतील  तेरा व्यक्ती बाधित आल्याने ती देखील संसर्ग वाढू नये म्हणून  बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडू नये ये, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित उपाययोजना म्हणून दुकानामध्ये एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना मनाई करण्यात आलेली आहे. दुकानात \गर्दी होत असल्यास  सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर बंधनकारक केले आहे.