covid 19 test

पुणे शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या प्रभगामधील ५१ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे सिरोसर्व्हेच्या (रक्तनामुन्यांची चाचणी) सर्वेक्षणामध्ये पुण्याने मुंबई आणि दिल्लीला मागे टाकले आहे.

पुणे : पुणे शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या प्रभगामधील ५१ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे सिरोसर्व्हेच्या (रक्तनामुन्यांची चाचणी) सर्वेक्षणामध्ये पुण्याने मुंबई आणि दिल्लीला मागे टाकले आहे. मुंबई, दिल्लीच्या तुलनेत पुण्यातील नागरीकांमध्ये सिरोसर्व्हेचे प्रमाण जास्त आहे. असे असले तरी या पाच प्रभागांत समूह रोगप्रतिकार शक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाल्याचे सध्या स्पष्टपणे म्हणता येणार नाही.

रुग्णांचे प्रमाण जास्त असलेल्या  पाच प्रभागातील नागरिकांच्या रक्त नमुन्यांची चाचणी भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी महापालिकेच्या सहकार्याने केली होती. त्यामध्ये ३६ टक्यांपासून ते ६४ टक्‍क्‍यांपर्यंत विविध प्रभागातील नागरिकांत अँटीबॉडीज असल्याची आकडेवारी समोर आली आहे. पुण्यासोबत मुंबई, दिल्लीमध्ये देखील ही चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये दिल्लीतील सर्वेक्षणात २१,०००  रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली त्यातील २३.४८ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या. तर मुंबई येथील ७,००० रक्त नमुन्यांपैकी १६ टक्के सामान्य लोकांमध्ये, तर ५७ टक्के झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये अँटिबॉडी आढळल्या होत्या. पुण्यातील सर्व्हेत १,६६४ रक्त म्हणून नमुन्यांपैकी ५१ टक्के रक्त नमुन्यामध्ये अँटिबॉडीचे प्रमाण आढळले.