अण्णाभाऊ साठे यांनी माणसाला माणूसपण देण्याचा केला प्रयत्न : डॉ.सुनील भंडगे

पुणे : शाहीर होनाजी बाळा, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यापासून आज २० व्या शतकातील शाहिरांपर्यंत शाहिरी परंपरा मोठी आहे. शाहीर अण्णा भाऊ साठे हे संघर्षशील कार्यकर्ते होते.

शाहिरी निनाद अंकाचे प्रकाशन व रक्तदान शिबीर

‘साठे जन्मशताब्दी वर्षा’

पुणे : शाहीर होनाजी बाळा, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यापासून आज २० व्या शतकातील शाहिरांपर्यंत शाहिरी परंपरा मोठी आहे. शाहीर अण्णा भाऊ साठे हे संघर्षशील कार्यकर्ते होते. त्याकाळात त्यांनी अस्तित्वाची लढाई लढण्यास लोकांना बळ देण्यासोबतच माणसाला माणूसपण देण्याचा प्रयत्न केला, हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्टय आहे,असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे फडके हौदाजवळील श्री कालिका सांस्कृतिक भवन येथे आयोजित रक्तदान शिबीरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त काढलेल्या शाहिरी निनाद या अंकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अंकाचे कार्यकारी संपादक सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, युवाशाहीर होनराज मावळे आदी उपस्थित होते.

डॉ. सुनील भंडगे म्हणाले, सामाजिक काम करताना आपल्याला नैराश्य येत नाही. अण्णा भाऊ साठे यांनी देखील सामाजिक जीवनात वेगळ्या प्रकारचे कार्य करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. माणसाला स्वत:च्या पायावर उभे करीत बळ देण्याचे काम अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेख, शाहिरीतून केले आहे.

-अण्णा भाऊंच्या आठवणींना उजाळा

आनंद सराफ म्हणाले, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने आपली परंपरा, संस्कृती जपत कोणतीही तडजोड न करता आपले कार्य सुरु ठेवले आहे. जनकल्याण रक्तपेढीची सहकार्याने कोरोनाच्या काळात रक्तदान शिबीर आयोजित करुन आदर्श निर्माण केला आहे. शाहीर हेमंत मावळे म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त काढलेल्या शाहिरी निनाद या अंकात त्यांच्याविषयीचे लेख, पोवाडे प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.