भीमाशंकर मंदिर दुसऱ्या श्रावणी सोमवारी भक्तांविना ओस

भिमाशंकर: हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकरला लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान व प्रशासनाच्या निर्णयामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने भीमाशंकर मंदिर भक्तांविना ओस पडले आहे.

प्रशासनाच्या निर्णयामुळे मंदिर बंद ; भाविक दाखल होऊ नये                                                                         

भीमाशंकर: हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जात असल्याने दरवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकरला लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थान व प्रशासनाच्या निर्णयामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले असल्याने भीमाशंकर मंदिर भक्तांविना ओस पडले आहे. येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी मोजक्या पुरोहितांच्या उपस्थितीत पूजाविधी पार पडला.

– १७५ व्यावसायिकांचा व्यापार बंद
बारा ज्योतिर्लींगांपैकी पुणे जिल्हयातील एकमेव असणारे भीमाशंकर मंदिर कोरोनामुळे बंद असल्याने मंदिर परीसरात असणाऱ्या लहान- मोठ्या सुमारे १७५ व्यावसायिकांचा व्यापार बंद पडला आहे. एसटी महामंडळाचा गाडया बंद आहे. त्यामुळे महामंडळाला देखील कोटयवधींचा फटका सहन करावा लागत आहे. मंदिर परिसरात भोलेंचा जय जयकार घुमणार नाही, ना भक्तांची गर्दी बघायला मिळणार. देशासह जगावर आलेले हे कोरोनाचे संकट लवकरात लवकर जाऊ दे, अशी प्रार्थना भक्तांकडून मनोमन शिवशंकराला करण्यात येत आहे.  
श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पवित्र शिवलींगाचे दर्शनासाठी मंदीर बंद असतानाही भाविक दाखल होऊ नये. यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांनी विशेष खबरदारी घेत आहे.