‘बिर्ला’च्या स्टाफ नर्सचे भर पावसात आंदोलन

पिंपरी : प्रशासनाकडून दिला जाणारा मानसिक त्रास आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या स्टाफ नर्स कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या विरोधात गुरुवारी रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले आहे.

पिंपरी : प्रशासनाकडून दिला जाणारा मानसिक त्रास आणि विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या स्टाफ नर्स कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या विरोधात गुरुवारी रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन केले आहे. भर पावसात हे आंदोलन सुरु होते. प्रशासनाकडून रुग्णसेविका, रुग्णसेवकावर मोठा अन्याय होत आहे. कोविड रुग्णालयात सहा तासच ड्युटी करण्याचा निर्णय आहे. पण, आम्हाला सात ते १२ तास ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल असे सांगतात. स्टाफ, बाऊंसरच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-प्रशासनाने अद्यापही वेतनवाढ प्रलंबित ठेवली
प्रशासनाने अद्यापही वेतनवाढ प्रलंबित ठेवली आहे. त्याचा शेकडो नर्सला फटका बसत आहे. याशिवाय अनेक मागण्या प्रलंबित असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहेदरम्यान, आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस देत रुग्णालय प्रशासनाची बाजू मांडली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना काम करायचे नाही तो त्यांचा हक्क आहे आणि आम्ही कोणालाही कामावर येण्यास भाग पाडू शकत नाही. त्याकरिता आम्ही पर्याय शोधत आहोत. दरवर्षी आम्ही जुलै महिन्यात वेतनवाढ करतो. यावर्षी जुलैमध्येही आम्ही असेच केले होते. शिवाय आम्ही मार्केट करेक्‍शननुसार वेतनवाढ केल्याने जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. आरोग्य उद्योग मंदीत असून फार कमी आस्थापनांनी यानुसार वेतनवाढ केली आहे, त्यापैकी आम्ही एक आहोत.