५ ऑगस्टला घरासमोर गुढी उभारा : मुळीक

वाघोली : (ता. हवेली) आयोध्या मध्ये ५ ऑगस्टला राम मंदीर बांधण्याच्या कामाला सुरुवात होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे या दिवशी सर्वांनी या उत्सवात सहभाग दर्शवत प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करावे तसेच आपल्या घरासमोर भगवी गुढी उभारावी असे आवाहन भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.

राम मंदिर उभारणीसाठी एक किलो चांदीची वीट
वाघोली : (ता. हवेली) आयोध्या मध्ये ५ ऑगस्टला राम मंदीर बांधण्याच्या कामाला सुरुवात होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचे देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे या दिवशी सर्वांनी या उत्सवात सहभाग दर्शवत प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करावे तसेच आपल्या घरासमोर भगवी गुढी उभारावी असे आवाहन भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.
राम मंदिर उभारणीसाठी भारतीय जनता पार्टी व स्व. माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या समरणार्थ नवीन सिंग परिवाराच्या वतीने एक किलो चांदीची वीट पाठविण्यात आली. यावेळी मुळीक बोलत होते. शहर अध्यक्ष मुळीक म्हणाले, प्रभू रामचंद्राचा जन्म या ठिकाणी झाला असल्याने याठिकाणी भव्य मंदिर उभारावे अशी देशवासीयांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. हे कार्य खूप वर्षानंतर मार्गी लागत आहे. नवीन सिंग म्हणाले, एक किलो चांदीचा वीट नवग्रहा पासून बनली आहे. ही विट प्रयाग राज येथे जाईल, त्याठिकाणी विधिवत पूजा केल्यानंतर वीट आयोध्यात मंदिर समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. यावेळी वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष संतोष खांदवे, मोहनराव शिंदे-सरकार, बाळासाहेब थोरवे, मिलिंद गायकवाड, प्रेम राय, विनीत वाजपेयी, नितीन खरात, मुकेश जाधव, अतुल जाधव, राजकुमार खोपकर आदी उपस्थित होते.