शहरात घरफोड्यांचा धुमाकूळ, ३ फ्लॅट फोडले

शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, कर्वेनगर भागात चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पांडुरंग शिंदे (वय ३१, रा. हिंगणे होमकॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, कर्वेनगर भागात चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पांडुरंग शिंदे (वय ३१, रा. हिंगणे होमकॉलनी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते कर्वेनगरमधील हिंगणेहोम कॉलनीत राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप उचकटून १ लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. त्याशिवाय त्यांच्या शेजारी असलेल्या दोन बंद फ्लॅटमध्येही चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र, त्याठिकाणी कोणीही राहायला नसल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक येवले अधिक आहेत.

दरम्यान शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर घरफोड्या आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिक घराबाहेर पडत असल्याचा फायदा घेतला जात आहे. परंतु, या घटना रोखण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.