लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

पारगाव : गणेशरोड नानगांव ता.दौंड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे (ता.०१) रोजी अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहून साजरी करण्यात आली आहे.

पारगाव  : गणेशरोड नानगांव ता.दौंड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे (ता.०१) रोजी अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहून साजरी करण्यात आली आहे.

आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना परिसरातील तरुणाचा मोठा सहभाग दिसून आला.भाजपा दौंड तालुका कला व सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष विष्णू खराडे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून या दोन थोर महापुरुषानी सामाजिक कार्यात केलेल्या कार्याला उजाळा दिला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ व लोकमान्य टिळक यांचा आदर्श सर्वानी समोर ठेवण्याचे आवाहन यावेळी माणिक आढागळे व सचिन शिंदे यांच्यावतीने करण्यात आले. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्या कारणाने सोशल डिस्टन्सचे नियम पाळत जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी राजकुमार मोटे(मा.सरपंच नानगांव),सचिन शिंदे(मा.चेअरमन विका.संस्था),विट्ठल खराडे(अध्यक्ष,दौंड कॉंग्रेस),सचिन रणदिवे,कुलदीप गुंड,विष्णु खराडे,संदिप रासकर,निलेश पठारे,दिपक पवार,सतीश जाधव,श्रीकांत ससाणे,स्वप्निल खळदकर आदि मान्यवर उपस्थित होते.