जागतिक आदिवासी दिनी भिल्ल समाजातील मुलांना भोजनाचा आस्वाद

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने येथील भिल्ल समाजातील मुलांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला. यामध्ये लापशी,डाळ-भात, पुरी भाजी याचा समावेश होता.या जेवणाने मुले आनंदित झाली.

 महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा उपक्रम

 कवठे येमाई : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने येथील भिल्ल समाजातील मुलांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला. यामध्ये लापशी,डाळ-भात, पुरी भाजी याचा समावेश होता. या जेवणाने मुले आनंदित झाली. या वेळी  संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले,उप सरपंच आरती चव्हाण उपस्थित होते. तर आजच्या भोजनाचे सहकार्य  डॉ. भालेकर मॅडम -शिरूर यांनी केले. आदिवासी दिनाच्या अनुषंगाने आदिवासी संस्कृती, व त्या संस्कृतीची मूल्ये ही सर्व मानवजातीने स्वीकारून समतेवर,बंधुभावावर,सहकार्यावर प्रेमावर समाज निर्माण व्हावा,हीच सदिच्छा यावेळी देण्यात आली. 

संपुर्ण जीवसृष्टी चा विचार करून,निसर्ग आधारित आदिवासी संस्कृतीची व्यापकता वाढवत माणूस आणि निसर्गातील वाढते अंतर आपणा सर्वांनाच कमी करावेच लागेल.व यासाठी आदिवासी जीवनपद्धती ही मार्गदर्शक ठरणार आहे.आदिवासी सांस्कृतिक वारसा जतन करतानाच आजच्या त्यांच्या मूलभूत प्रश्नांची तीव्रता ही अधिक वाढली आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही.आदिवासी समुदायाच्या मूलभूत प्रश्नांची चर्चा करत असतानाच या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची शिकस्त ही अपरिहार्य आहे.

राणी कर्डिले – अध्यक्षा,रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था,रामलिंग शिरूर