निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वच्या सर्व जागा लढवेल : बाळासाहेब सांळुके

आगामी कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वच्या सर्व जागा लढवेल अशी घोषणा काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सांळुके यांनी युवक कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात केली.

कर्जत :आगामी कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वच्या सर्व जागा लढवेल अशी घोषणा काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सांळुके यांनी युवक कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात केली. कर्जत तालुका युवक काँग्रेसकडून कार्यकर्ता संवाद हा कार्यक्रम अध्यक्ष सचिन घुले यांनी आयोजित होता.हा कार्यक्रम हाॅटेल लकी येथे पार पडला.या कार्यक्रमाकार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाळासाहेब सांळुके पुढे म्हणाले की, राजीव गांधी यांनी युवकांना मतदानाचा अधिकार दिला. इंटरनेट ही राजीव गांधी याचीच देणगी आहे.

युवकांना १९४७ वर्षांपूर्वी चा इतिहास माहिती होणे गरजेचे आहे. घरात बसून पक्ष वाढणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवकांना संधी दिली जाणार आहे. युवक व युवतीनी मोठ्या प्रमाणात पक्षाच्या कामासाठी योगदान दिले पाहिजे. मोठ्या प्रमाणात लोकांची कामे महसुल विभागाकडेच असते व खाते काँग्रेस कडे आहे.त्यामुळे युवकांनी जनतेचे कामे करणे गरजेचे आहे लोकाच्यात जावून काम करा, जनतेत मिसळून च पक्ष मोठा होईल. युवकांचे संघटन मजबूत होणे गरजेचे आहे.कर्जत नगरपंचायती ची निवडणूक ही स्वबळावर लढविली जाईल त्यासाठी याची तयारी आत्ता पासून चालू सुरू करा. यापुढील काळातील निवडणुकीत युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे. पुढील काळात वाकडे वागल्या शिवाय पर्याय नाही. असे सुचक वक्तव्य करीत सांळुके यांनी युवकांना कामाला लागण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद चे मा सदस्य प्रविण घुले यांनी ना. बाळासाहेब थोरात जिल्ह्यातील एक सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला लांभले असल्याने काँग्रेस पक्षाचे भविष्यात चांगले आहेत. संघटन करताना घरा घरात काम पोहोचले पाहिजे यासाठी जोमाने काम करू शकता चांगले काम केले तरच तुम्ही तुमची पायवाट तयार करू शकता. प्रमाणीक काम केले तर अडचणी निर्माण होत नाहीत .सर्वसामान्य कार्यकर्ते ला काँग्रेसने संधी दिलेली आहे. काँग्रेस पक्ष हा कुटुंब म्हणून जपावा तरच पक्ष बळकट होईल . तालुक्यात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन ही घुले यांनी केले. यावेळी कर्जत जामखेड चे समन्वयक शंकर वाबळे यांनी ही युवकांना पक्षाचे महत्त्व व युवक संघटन यावर अनमोल सल्ला दिला. तर प्रस्ताविक कर्जत जामखेड चे युवकअधक्ष नगरसेवक सचिन घुले यांनी केलेतर आभार अमोल भगत यांनी मानले. यावेळी नगरसेवक एकांकिका तोटे, डाॅ संदीप बरबडे,हर्षद शेवाळे, तालुका अध्यक्ष किरण पाटील, अजित शेळके यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते तर मिलिंद बागल यांनी सुत्रसंचालन केले