पुणे विद्यापीठात वाढतोय कोरोनाचा कहर

शहरात एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. रोज हजारोंच्या संख्येत कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.

पुणे : शहरात एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. रोज हजारोंच्या संख्येत कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अशातच पुणे विद्यापीठात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. लॉक डाऊन मध्ये विद्यापीठाचे कोरोनावर नियंत्रण होते मात्र आता हळू हळू कोरोनाचा कहर वाढत जाऊन रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 

विद्यापीठातील एकट्या सुरक्षा विभागातच २४ जणांना लागण झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे विद्यापीठात सर्व इमारती, प्रवेशद्वार याठिकाणी पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे रक्षक तैनात असतात. गेल्या आठवड्यात एका सुरक्षा रक्षकाला ‘कोरोना’ झाल्याचे लक्षात येताच उर्वरीत सुरक्षा रक्षकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २०० जणांमध्ये २३ जणांना ‘कोरोना’ झाल्याचे समोर आले. हे सर्वजण सध्या गरवारे आणि सीओईपी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत. तर, शुक्रवारी आणखी एकास लागण झाली आहे.

याआधी परीक्षा विभागातील एक अधिकारी, इस्टेट विभागातील कर्मचारी यांना लागण झाली होती. विद्यापीठात कोरोना वाढत असल्याने परिसरात भीती निर्माण झाली आहे.