सोलापुरात वाढत चाललाय कोरोनाचा कहर

सोलापूर : महाराष्ट्रासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यातच आता सोलापुरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

सोलापूर : महाराष्ट्रासह  जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्यातच आता सोलापुरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात २५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या जिल्ह्यात ३०४८ जणांवर उपचार सुरू असून कोरोनाग्रस्तांचा आकडा ९४९१ वर पोहचला आहे. 

गेल्या २४ तासात ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांचा आकडा हा ४९४ वर पोहचला आहे.