शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोविड कक्ष सुरु करु नये

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी,मारुती मंदिर चौकामध्ये होत असलेले कोविड -१९ कक्ष सुरू करू नये, अशी मागणी गटनेते,ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे व व्यापारी व परिसरातील नागरिक यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे केली आहे.

नगरसेवक किशोर भेगडे यांची मागणी
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी,मारुती मंदिर चौकामध्ये होत असलेले कोविड -१९ कक्ष सुरू करू नये, अशी मागणी गटनेते,ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे व व्यापारी व परिसरातील नागरिक यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे केली आहे.
– व्यावसायिकाकडून कडाडून विरोध
मारुती मंदिर चौकामध्ये असलेल्या पै. विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुल मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोव्हिड १९ कक्ष सुरू करण्यात येणार आहे. यास परिसरातील नागरिकांकडून, व्यावसायिकाकडून कडाडून विरोध होत आहे.
या क्रीडा संकुल च्या बाजूला नगरपरिषदेचे भव्य व्यापारी संकुल आहे. रोजचा भाजीपाला व्यवसाय या संकुलाच्या पुढच्या मैदानावर होत आहे. या संकुलाच्या पुढे नगरपरिषदेची प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. बाजूला मोठी नागरी वस्ती आहे. तसेच दिवस रात्र रहदारीचा रस्ता देखील या क्रीडा संकुलाच्या बाजूने जात आहे. याशिवाय या क्रीडा संकुलामध्ये उपचारासाठी येणाऱ्या पेशंटचे सांडपाणी नागरी वस्ती मधून उघड्या गटारी मधून जात आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून याठिकाणी कोविड १९ कक्ष उभारून तळेगाव करांच्या आरोग्या कडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे असे वाटते. हे कक्ष सुरू करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांना त्याचा निश्चितच त्रास होईल. म्हणून या ठिकाणी हे कोव्हीड कक्ष करू नये. इतर ठिकाणी वर्ग करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम प्रकाश खोल्लम, कापड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र पटवा, मयूर मेहता आदी मान्यवरांनी केली आहे.