मास्क न वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल

पुर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत चालला असुन मृत्यूची आकडेवारी सुध्दा वाढत आहे . पुणे जिल्हयातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोरोना (covid 19) या संसर्गजन्य रोगाचा फैलाव वाढतो आहे.

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई
लोणी काळभोर : पुर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत चालला असुन मृत्यूची आकडेवारी सुध्दा वाढत आहे . पुणे जिल्हयातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोरोना (covid 19) या संसर्गजन्य रोगाचा फैलाव वाढतो आहे. हा संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांना सार्वजनिक टिकाणी प्रवास करताना, फिरताना मास्क घालणे( mask compulsion) आवश्यक आहे.

तथापि, अशा प्रकारे मास्क न घालता अनेक ठिकाणी नागरिक फिरताना दिसतात. अशा नागरिकांमुळे कोरोना संसर्गजन्य आजार वाढु शकतो . त्यामुळे कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालता फिरणा-या नागरिकांना रु. ५००/- दंडाची आकारणी करण्यात यावी.

तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी धुंकताना आढळल्यास त्यासाठी रु. १०००/- दंडाची आकारणी करण्यात यावी असा आदेश जिल्ह्याधिकारी राजेश देशमुख यांनी दिला असून त्यानुसार आज लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत लोणी येथे पस्तीस तर उरुळी कांचन,सोरतापवाडी,शिंदवणे या गावातील सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांनवर ,दुचाकीस्वार तसेच सोशल डिस्टन न पाळणाऱ्यांवर २९ गुन्हे करून त्यांच्या कडून ५,५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.