हॉटेलमध्ये बसून ग्राहकांना खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी दिल्याप्रकरणी तीन हॉटेल मालकांवर  गुन्हे

सातारा : कोरोनामुळे सरकारने हॉटेलचालकांना ग्राहकांसाठी ‘टेक अवे’ सुविधा पुरविण्यास सांगितली आहे. मात्र शहरातील तीन  हॉटेलमालकांनी या आदेशाला धुडकावत  ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून  खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी दिल्यामुळे शहरातील या तिघांवर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी अशोक बजरंग पवार (वय ४५, रा. शाहूनगर, सातारा), संदीप सचिन गायकवाड (वय ४७, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) आणि केदार उल्हास भोसले (वय २६, रा. समर्थ मंदिर परिसर, सातारा)  यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.