अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी

शिरूर : साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे व साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ महामंडळाला तत्काळ निधी देण्यात यावा अशी मागणी लहुजी शक्ती सेना शिरूरच्यावतीने तहसिलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देवुन केली असल्याची माहिती लहुजी शक्ती युवा सेना युवकचे शहराध्यक्ष विशाल जोगदंड यांनी दिली.

  लहुजी शक्ती सेना शिरूरच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जागतिक कीर्तीचे महान साहित्यिक ज्यांचे साहित्य २७ आंतरराष्ट्रीय भाषेत प्रकाशित झाले आहे, असे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त सरकारने त्यांना सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.

     मागील काही वर्षापासून मातंग समाजाच्या उन्नतीचे एकमेव साधन असणाऱ्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे कामकाज निधी अभावी बंद आहे.यामुळे शासनाने या महामंडळाला तत्काळ निधी उपलब्ध करून देऊन महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने चालू करावे अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.