उपमुख्यमंत्र्यांनी केली जम्बो रुग्णालयाची पाहणी

पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. शहरात दिवसोंदिवस रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. रुग्णांच्या या वाढत्या संक्रमणामुळे नेहरूनगर येथे एक हजार बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे.

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. शहरात दिवसोंदिवस रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे.  रुग्णांच्या या वाढत्या संक्रमणामुळे नेहरूनगर येथे एक हजार बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात येत आहे.  राज्य शासन, पुणे पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या वतीने हे रुग्णालय बांधण्यात येणार असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.

 सद्यस्थितीत येथे शेड उभारून निवारा करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मैदानामध्ये विभाग करण्यात आले आहे. सद्यस्थितीत दोन विभागांचा साठा उभारून पूर्ण झाला आहे. त्याची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. यावेळी पवार म्हणाले, दोन्ही शहरांमधील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने सावध होणे आवश्‍यक आहे. रुग्णांची गैरसोय होता कामा नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या वेगात जम्बो रुग्णालयाचे काम पूर्ण करावे. यावेळी, विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, संजोग वाघेरे, वैशाली घोडेकर आदी उपस्थित होते.