दमदार पावसामुळे वारणा धरणात १४.६६ TMC पाणीसाठा

सांगली :जिल्ह्यातील मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने वारणा धरणात  १४.६६ TMCपाणीसाठा झाला असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४०TMC इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.

 

शहरात  विविध धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये 

कोयना २१११, वारणा ५६०, कण्हेर २४, उरमोडी १००, तारळी ३७०, अलमट्टी ११३०., राधानगरी ६००, तुळशी १००, 

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे.

कृष्णा पूल कराड ५.७(४५), आयर्विन पूल सांगली ६.९ (४०) व अंकली पूल हरिपूर ५.११ (४५.११).