मित्राच्या मदतीने अकरा वर्षीय बालिकेवर बलात्कार

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे मित्राच्या मदतीने एका युवकाने अकरा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून मारहाण करत चक्क अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघा मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिरूर तालुक्यातील पाबळ येथील घटना, दोघांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे मित्राच्या मदतीने एका युवकाने अकरा वर्षीय मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून मारहाण करत चक्क अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघा मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

पाबळ (ता. शिरूर) येथील पीडित अल्पवयीन मुलगी सायंकाळच्या सुमारास घरी नसल्याने मुलीच्या आईने शेजारील मुलाला त्यांच्या मुलीचा शोध घेण्यास सांगितले. शेजारील मुलगा सदर अल्पवयीन मुलीचा परिसरात शोध घेत असताना मुलगी गावातील एका मुला बरोबर मंदिराच्या पाठीमागील अंधारातून येताना दिसली. दरम्यान मुलगी रडत होती यावेळी मुलीचा शोध घेणाऱ्या मुलाने त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आईकडे घेऊन जात, तुमची मुलगी आणि गावातील समीर चव्हाण या दोघांना मंदिराच्या मागील अंधारातून बाहेर येताना पाहिले असून त्यावेळी मुलगी रडत असल्याचे सांगितले. त्यांनतर पिडीत मुलीच्या आईने मुलीकडे चौकशी करत रडण्याचे कारण विचारले असता मुलीने सांगितले कि आपल्या घरी येत असताना गावातील समीर चव्हाण याने मंदिरामध्ये बोलावून घेत त्याच्याजवळील मोबाईल मध्ये वेगवेगळे घाणेरडे व्हिडीओ दाखविले. तेव्हा तेथे मंगेश चव्हाण आला त्यानंतर समीर याने त्याचेजवळ मोबाईल देऊन आम्ही मागे जातो कोणी आले तर मला सांग असे बोलून माझे तोंड दाबून मला अंधारात मंदिराच्या मागे नेले आणि तेथे घेऊन जात माझ्यावर जबरदस्ती करत मारहाण करून बलात्कार केला असल्याचे सांगितले. त्यांनतर पिडीत मुलीच्या आईने नातेवाइकांसह शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठले आणि याबाबत पिडीत मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी समीर म्हातारबा चव्हाण व मंगेश राजू चव्हाण दोघे रा. पाबळ (ता. शिरूर) यांच्या विरुद्ध अल्पवयीन युवतीवर बलात्कार तसेच बलात्कार करण्यास साथ दिल्या प्रकरणी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून बलात्कार करण्यास आरोपीला साथ देणाऱ्या मंगेश राजू चव्हाण दोघे रा. पाबळ( ता. शिरूर) यास अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.