सर्वांनी जबाबदारी व उत्तरदायित्व ओळखून कार्य करावे: लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे

संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक भारतीयांनी निस्वार्थीपणे आपली कर्तव्ये, जबाबदारी व उत्तरदायित्व ओळखून कार्य करावे.

एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिवस साजरा

पुणे : संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येक भारतीयांनी निस्वार्थीपणे आपली कर्तव्ये, जबाबदारी व उत्तरदायित्व ओळखून कार्य करावे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू मनाने विकासाचा योग्य मार्ग निवडत देशाला प्रगतीपथावर घेऊन जावे, असे प्रतिपादन भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईऩ आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिवस मंगळवारी(दि.११) ऑनलाईन माध्यमांद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्त्रोचे माजी संचालक पद्मश्री प्रमोद काळे, केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ. राघवराव केएसएमएस, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ. दा. कराड एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व प्रभारी कुलगुरू प्रा डॉ. मंगेश कराड, प्रा. सुनीता मंगेश कराड, कुलसचिव शिवशरण माळी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय लाऊन घ्यावी

जनरल एम.एम. नरवणे म्हणाले, मूल्यात्मक शिक्षण देण्यासाठीचे विद्यापीठांमध्ये वातावरण निर्मिती व्हावे. माझ्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात अनेक आव्हानाचा सामना करत वाटचाल केली. एकाच क्षेत्रात अनेक वर्ष व्यथित केल्यामुळे अनेक बाबींचा अभ्यास करता आला. प्रत्येकांनी आपली जबाबदारी ओळखावी. विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाची सवय लाऊन घ्यावी. अभ्यासक्रमाबरोबरच आवांतर वाचनाची आवड निर्माण करावी. यामुळे आपल्याला नवीन कल्पना मिळेल. सांघिक कार्याने आपले धैय साध्य करावे. ध्येय आणि उद्दिष्टे ठरवून ते प्राप्तीसाठी प्रयत्न करावे. आपल्या उपक्रमांना वेळ दिल्यास यश नक्कीच मिळते. वक्तशीरपणा ही सवय यश संपादनाची महत्वपूर्ण बाब असून त्यासाठी प्रयत्न करावे.

शिक्षणाची व्यवस्था आणखी मजबूत करावी लागणार

डॉ. प्रमोद काळे म्हणाले, आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी हा महत्वाचा संयोजन आहे. कोरोना महामारीने शिक्षण पद्धतीवर मोठा परिणाम झाला आहे, मात्र तंत्रज्ञानाचा वाढता विस्तार पाहता शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहे.

दुरस्थ शिक्षणाची व्यवस्था आणखी मजबूत करावी लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळात वायु प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र होते. या महामारीमुळे नागरिक आरोग्याविषयी सतर्क झाले आहेत. सध्याच्या परिस्थित भारतीयांसाठी एक संधी असून त्यांनी मेड इन इंडियासाठी तयार राहवे.

अन्न पुरवठा साखळी मजबूत करावी लागणार

राघवराव केएसएमएस म्हणाले, सध्याला ऑनलाईन शिकवणीची गरज वाढत आहे. कोरोना महामारीने संपूर्ण मानवजातीला प्रभावीत केले असले, तरी फुड इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगले दिवस आले आहेत. सध्याला आरोग्यदायी व इम्युनिटी बुस्ट करणाऱ्या अन्नाची गरज आहे. ती गरज फुड इंडस्ट्री भागवत आहेत. अन्न पुरवठा साखळी मजबूत करावी लागणार आहे. फुड प्रोसोसिंगमध्ये ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी आहे. आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागणार आहे.

मूल्यात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विद्यापीठाची काय जबाबदारी असते ती ओळखून कार्य करत रहावे. संशोधन, नवनिर्मिती आणि सर्जनशीलता याचा वापर आपल्या कार्यशैलीत करावा. केवळ शिक्षण देणे ही विद्यापीठाची जबाबदारी नसून उद्याचे भविष्य घडविण्याऱ्या युवकांची क्षमता ओळखून त्यांना सक्षम करण्याची जबाबदारी आहे. जागतिक स्तरावरील आत्याधुनिक शिक्षण पद्धतीने मूल्यात्मक शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे. विज्ञानासोबत अध्यात्माचे शिक्षण देत सर्व समस्यांचे समाधान करणारे शिक्षण द्यावे. प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, विद्यापीठातील सर्व विद्याशाखा ऑनलाईन पद्धतीने शिक्षणासाठी तयार केल्या आहेत. विद्यापीठात इनोव्हेशन संस्कृती निर्माण केली आहे. नैतिक मुल्य जपत मुल्यात्मक शिक्षण रुजविण्याचे कार्य करत आहोत. ग्लोबल प्रोफेसनल तयार करण्याचा आमचा उद्देश आहे.

प्रा. स्वप्निल शिरसाठ व प्रा, मोनिका भोयर यांनी सूत्रसंचालन केले. विरेंद्र घैसास यांनी आभार मानले.